गावगुंडानेच सांगितलं माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी | नाना पटोले

2022-01-23 8

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान असलेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. भाजपने ठिकठिकाणी आंदोलन सुरू करून पटोलेंना कोंडीत पकडलं आहे. हे सर्व प्रकरण अंगलट आल्यानंतर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललोच नाही. गावातील एका गावगुंडाबाबत मी ते विधान केलं आहे, अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. कथित गावगुंड शुक्रवारी नागपुरात प्रकटला. त्याने पत्रकार परिषद घेऊन 'मी दारू विकतो आणि दारूच्या नशेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यास शिवीगाळही केली', अशी कबुली दिली. त्यानंतर आज रविवारी प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, गावगुंडानेच सांगितलं माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी पडलं. त्याच स्टेटमेंटला आता भाजप घेऊन बसली आहे. देशात काय एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करतायेत. जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा तुम्हाला जनताच पेटवेल असं ते यावेळी म्हणाले.

Videos similaires